Today’s Horoscope 04 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग -Today’s Horoscope 04 September 2023
वार – सोमवार.
04.09.2023
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष- शिवमुश्ठी ( मूग),
राहू काळ – सकाळी 7.30 ते 9.00.
दिशा शूल -पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – अश्विनी 9.27 पर्यंत, नंतर भरणी.
चंद्र राशी – मेष.
—————————————-
मेष – ( शुभ रंग- पिस्ता )
आज तुमची तब्येत काहीशी नरमच असेल. मन हळवे करणारा एखाद्या प्रसंग घडेल. तुम्ही जशास तसे या धोरणाने वागा. क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घेऊ नका.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )
आज तुम्हाला काही अत्यावश्यक देणी चुकवावी लागतील. दूरच्या प्रवासात आपले मौल्यवान ऐवज सांभाळा. कठोर बोलून आपल्या हितचिंतकांनाच दुखावू नका. प्रलोभने टाळा.

मिथुन ( शुभ रंग- निळा )
जसे चिंताल तसेच होईल. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होतील. व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. छान दिवस.

कर्क (शुभ रंग- मोरपिशी) Today’s Horoscope 04 September 2023
उद्योगधंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. अधिकार योग चालून येतील. हाताखालच्या लोकांवर तुमचा वचक राहील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

सिंह (शुभ रंग- क्रीम )
आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत आज अवश्य घ्या. वाहतुकीचे नियम मोडलेत तर दंड चुकणार नाही. आपल्या मर्यादेत रहा.

कन्या ( शुभ रंग- भगवा)
नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. आज मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रात ही सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. गाडी चालवताना ओव्हरटेक नको.

तूळ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. वाद विवादात आपलीच मते इतरांवर लादू शकाल. आज वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी राहील.

वृश्चिक (शुभ रंग- राखाडी)
काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्य विषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. विद्यार्थ्यांना आज कोणत्याही स्पर्धेत निर्विवाद यश मिळेल.

धनु (शुभ रंग-मरून)
आज तुम्ही उच्च राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाने वागाल. व्यक्तिमत्व विकासावर आज भर द्याल. गृहिणी आज पार्लर साठी आवर्जून वेळ काढतील. आज सहकुटुंब चैन कराल

मकर ( शुभ रंग- निळा )
धंद्यातील येणी वसूल होतील. कार्यक्षेत्रात आज स्वतःचे महत्त्व सिद्ध करता येईल. आज फक्त गोड बोलून आपला स्वार्थ साधा, आज इतरांच्या भानगडीत अजिबात पडू नका.

कुंभ (शुभ रंग – सोनेरी)
दिवसाच्या पूर्वार्धातच काही येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील. आज शक्यतो प्रवासाची दगदग टाळा.

मीन (शुभ रंग – लाल )
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झोपणारी कामे सहजच पूर्ण कराल.व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज तुमच्यातील मीपणा वाढण्याची आज शक्यता आहे.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क  9689165424

Talegaon Dabhade : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेत शिक्षक दिनाचे आयोजन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.