Talegaon : सोमाटणे फाट्याजवळ वन विभागाच्या डोंगरावर आग

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावर (Talegaon ) सोमाटणे फाटा येथे वन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या डोंगरावर आग लागली. ही घटना रविवारी (दि. 23) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली.

रविवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास वन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या डोंगराला आग लागल्याची घटना उघडकीस आली. डोंगरावर आणि आजूबाजूच्या परिसरात वाळलेले गवत असल्याने काही क्षणात आग पसरली.

Pimpri : पूर्ववैमनस्यातून तरुणाला रिक्षाने नेले फरफटत; विरोध करण्यासाठी आलेल्या बहिणीवर कोयत्याने वार

 

तळेगाव एमआयडीसी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जवानांनी वन विभाग, तळेगाव दाभाडे पोलीस, आपदा मित्र, वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या स्वयंसेवकांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळवले.

दरम्यान, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा बंब डीझेल नसल्याने पेट्रोल पंपावर काही वेळ थांबून होता. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच प्रशासनाने हालचाली करून बंब घटनास्थळी रवाना (Talegaon ) केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.