Pimpri : पूर्ववैमनस्यातून तरुणाला रिक्षाने नेले फरफटत; विरोध करण्यासाठी आलेल्या बहिणीवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून ( Pimpri ) सात जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. तरुणाच्या अंगावर रिक्षा घालून सुमारे 60 फूट फरफटत नेले. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाच्या बहिणीच्या डोक्यात कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरुवारी (दि. 20) रात्री यशवंतनगर, पिंपरी येथे घडला.

अनंत डेंगळे, दीपक कांबळे, नवनाथ डेंगळे, साहिल वाघमारे, तीन महिला (सर्व रा. यशवंतनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शंकर संभाजी चौधरी (वय 23, रा. यशवंतनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Aalandi : लायसन्स क्लब पिंपरी चिंचवड यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर देवस्थानला संगणक भेट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून फिर्यादीच्या अंगावर रिक्षा घालून त्यांना 50 ते 60 फूट अंतरावर फरफटत नेले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दहशत निर्माण केली. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांची बहिण आली असता आरोपींनी फिर्यादीच्या बहिणीच्या डोक्यात कोयता मारून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पिंपरी पोलीस तपास ( Pimpri ) करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.