Ravet : शस्त्राच्या धाकाने लॉज चालकाला लुटले

एमपीसी न्यूज – लॉजमध्ये काउंटरवर बसलेल्या लॉज चालकाला (Ravet) शस्त्राचा धाक दाखवून लॉजच्या गल्ल्यातून सात हजार रुपये चौघांनी चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 22) दुपारी साडेतीन वाजता म्हस्केवस्ती रावेत येथील शौर्य लॉज येथे घडली.

अमित गजानन वानरे (वय 32), विशाल बाळू वाजे (वय 22), साजन मधुकर खेडेकर (वय 30, तिघे रा. देहूरोड), राज संतोष कांबळे (वय 21, रा. किवळे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सत्यरंजन सुरेंद्र लिंका (वय 43, रा. रावेत. मूळ रा. ओडीसा) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Aalandi : लायसन्स क्लब पिंपरी चिंचवड यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर देवस्थानला संगणक भेट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या लॉजमध्ये काउंटरवर बसले असताना आरोपी कार आणि दुचाकीवरून आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी यांना काठीने मारहाण केली.(Ravet) त्यानंतर जबरदस्तीने काउंटरवर मधून सात हजार रुपये रोख रक्कम आरोपींनी काढून नेली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.