Wakad : विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – फोन करून महिलेसोबत अश्लील भाषेत बोलून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. (Wakad) ही घटना 29 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत काळेवाडी येथे घडली.

मारुती देवराम बोईनवाड (वय 32, रा. तळवडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pimpri : पूर्ववैमनस्यातून तरुणाला रिक्षाने नेले फरफटत; विरोध करण्यासाठी आलेल्या बहिणीवर कोयत्याने वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या घरी असताना आरोपीने त्यांना फोन केला. फिर्यादीशी बोलायचे आहे, असे म्हणत त्याने अश्लील भाषेत बोलून फिर्यादीचा विनयभंग केला.(Wakad) तसेच फिर्यादी यांच्या आईला देखील फोनवर अश्लील भाषेत बोलून त्यांचाही विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.