Mahalunge : पुणे-नाशिक महामार्गावर अपघात; एकाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील कुरुळी येथे अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने पादचारी व्यक्तीला धडक दिली (Mahalunge) असून पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 21) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडला.

संतोष देविदास कुलकर्णी (वय 32, रा. उखळी, ता. सोनपेठ, जि. परभणी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दीपक भगवान पाचमासे (वय 30, रा. आळंदी, ता. खेड) यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Wakad : विनयभंग प्रकरणी एकास अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी येथे नाशिक-पुणे या बाजूने रस्ता ओलांडत होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या अनोळखी दुचाकीस्वाराने संतोष कुलकर्णी यांना जोरात धडक दिली. त्यात संतोष हे गंभीर जखमी झाले. (Mahalunge) अपघात झाल्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळी न थांबता निघून गेला. दरम्यान गंभीर जखमी झाल्याने संतोष यांचा मृत्यू झाला. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.