Talegaon : गाडीला कट मारल्याचा जाब विचारत कार चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – माझ्या गाडीला कट का मारला, असा (Talegaon) जाब विचारत एका कार चालकाला प्लास्टिक पाईपने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 1) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सोमाटणे टोलनाका येथे घडली.

हेमंत सुखलाल चव्हाण (वय 35, रा. वराळे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन मल्लिनाथ स्वामी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchwad : जीवे मारण्याची धमकी देत व्यावसायिकाकडे मागितली खंडणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कारमधून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने जात होते. सोमाटणे टोलनाका येथे लेन क्रमांक एक येथे ते थांबले असता त्यांच्या पाठीमागील कारमधून आलेल्या आरोपीने फिर्यादीस थांबवले.

‘तू माझ्या गाडीला कट का मारला’ असे म्हणून त्याच्या गाडीत असलेल्या प्लास्टिक पाईपने फिर्यादीच्या कानावर मारून दुखापत केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत (Talegaon) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.