Chinchwad : जीवे मारण्याची धमकी देत व्यावसायिकाकडे मागितली खंडणी

एमपीसी न्यूज – जीवे मारण्याची धमकी देत चार जणांनी एका (Chinchwad) हातगाडी चालकाकडे खंडणी मागितली. तसेच हातगाडीची आणि टेम्पोची तोडफोड केली. ही घटना 26 ते 30 सप्टेंबर या कालावधीत रामनगर, चिंचवड येथे घडली.

Wakad : दारू पिण्यास मज्जाव केल्याने व्यावसायिकावर खूनी हल्ला

शाहरुख नजीम शेख (वय 29, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित हनुमंत मांजरेकर, अजय राजू माने, मनीष रमेश चव्हाण, विशाल साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची रामनगर चिंचवड येथे वडापावची हातगाडी आहे. 26 सप्टेंबर रोजी आरोपींनी फिर्यादी यांच्या गाडीवर येऊन वडापाव खाल्ले.

त्यानंतर ‘या एरियाचा डॉन गीड्याचा मर्डर मीच टाकला आहे. तुला या एरियामध्ये धंदा करायचा असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल.

नाहीतर तुझापण मर्डर टाकू’ अशी धमकी दिली. 27 सप्टेंबर रोजी पुन्हा आरोपींनी रामनगर येथील एका बेकरीच्या दुकानात येऊन हप्त्याची मागणी केली.

30 सप्टेंबर रोजी रात्री फिर्यादी यांच्या बंद हातगाडीची आणि टेम्पोची तोडफोड केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत (Chinchwad)  आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.