Talegaon : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे घवघवीत यश

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत तळेगाव (Talegaon) दाभाडे येथील मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवले.

Nigdi : वसुंधरेची शपथ घेवून 50 हजार वृक्षरोपणास सुरुवात

‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास मंडळ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार राजेश पांडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. विविध महाविद्यालयांच्या 285 स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला.

 

या स्पर्धेत सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील प्रणाली गाढवे हिने मराठी माध्यमातील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. लोकगीत गायन स्पर्धेत धनश्री शिंदे हिने प्रथम क्रमांक मिळवला. भित्तीचित्र स्पर्धेत श्रद्धा पारखी हिला द्वितीय क्रमांक मिळाला.

 

 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीहरी मिसाळ यांनी विजेत्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करून विद्यार्थिनींसह प्राध्यापकांचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. माधुरी चंदनशिव यांनी मुख्य समन्वयक म्हणून काम पाहिले. 24 सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात, राष्ट्रीय सेवा योजनेच्या नामदेव सभागृहात विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. विद्यार्थिनींना प्रा. डॉ. विनया केसकर, प्रा. मनीषा लगड, प्रा. शिल्पा वाजे, प्रा. सोमनाथ कसबे, प्रा. साबेरा शेख आदींनी मार्गदर्शन केले.

 

गावच्या मातीचे अमृत कलशात संकलन

‘मेरी माटी मेरा देश’ या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना संलग्नित उपक्रमामध्ये सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींनी आपापल्या गावांमधून आणलेल्या मातीचे अमृत कलशात संकलन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीहरी मिसाळ यांच्या हस्ते कलशपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. माधुरी चंदनशिव, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.