Talegaon Dabhade : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात स्नेहसंमेलन ( Talegaon Dabhade) आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 17) रोजी संपन्न झाला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन तळेगाव दाभाडे येथील इनरव्हिल क्लबच्या अध्यक्ष संध्या थोरात यांच्या हस्ते झाले. विद्यार्थिनींनी कोणत्याही क्षणिक गोष्टीत न अडकता आपल्या करिअरकडे लक्ष देऊन आपले ध्येय साध्य करून आई-वडिलांचे नाव मोठे करावे, असे प्रतिपादन आमदार सुनील शेळके यांनी केले.वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुनील शेळके हे होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार सुनिल शेळके म्हणाले विद्यार्थिनींनी कोणत्याही क्षणिक गोष्टीत न अडकता आपल्या करिअर कडे लक्ष देऊन आपले ध्येय साध्य करून आई -वडिलांचे नाव मोठे करावे. तुम्ही माझ्या बहिणीसारख्या असून तुम्हाला काही शैक्षणिक अडचणी आल्यास तर मी तुमच्या भावासारखी मदत करेल. आज आपले महाविद्यालय उत्तम प्रकारे काम करत असून त्यात तुमचा  देखील मोलाचा वाटा आहे.

Hinjawadi : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तळेगाव दाभाडे येथील अंबर साप्ताहिकाचे संपादक सुरेश साखवळकर यांनी ‘भरारी’ या  हस्तलिखिताचे विमोचन केले. विद्यार्थिनींनीचे हस्त लिखितातील उत्तम लेखनाबद्दल कौतुक केले.साहित्य,कला आणि संगीत अशा विविध क्षेत्रातून आपला विकास साधावा आपल्यासमोर आवाहन असून त्यावर मात करून आपला विकास साधत गावाचा तालुक्याचा तसेच देशाच्या विकासाला आपण हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले.

संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे यांनी या महाविद्यालयाला नॅक कडून ‘बी’ ग्रेड मिळाल्याबद्दल कौतुक केले. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले पूर्वी तीन दिवस वार्षिक स्नेहसंमेलन होत असे. स्नेहसंमेलनात विद्यार्थिनींनी रांगोळ्यांमधून भारतीय संस्कृतीचे दर्शन करून दिले. आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे त्यामुळे तुम्ही ठरवाल ते पार पाडाल असे मला वाटते.संस्थेचे सहसचिव प्राध्यापक वसंत पवार यांनी महाविद्यालयाला ‘नॅकची बी’ ग्रेड मिळाल्याबद्दल प्राचार्य व प्राध्यापकांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे संस्थेचे खजिनदार  नंदकुमार शेलार साहेब उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीहरी मिसाळ यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी महाविद्यालयातील वाढती विद्यार्थीनींची संख्या,कला शाखेचा निकाल 100% तर वाणिज्य शाखेचा निकाल 95% या बाबी महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उत्तम असल्याचे प्रतिक आहेत असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी 2023-24 या वर्षातील ‘आदर्श विद्यार्थिनी’ कुमारी संचिता हारपुडे या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रा. सोमनाथ कसबे यांनी महाविद्यालयांच्या कार्य अहवालाचे वाचन केले. वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त महाविद्यायात वक्तृत्व, निबंध, काव्यवाचन, रांगोळी, मेहंदी, पाककला, केशरचना, क्रिडा अश्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात विद्यार्थीनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून यश संपादन केले.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती पाटील तसेच पारितोषिक वितरणाचे प्रा. मनिषा लगड आणि प्रा. माधवी शेटे यांनी केले. प्रा. शिल्पा वाजे यांनी आभार मानले. महाविद्यालातील सर्व  प्राध्यापक वर्ग, कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ( Talegaon Dabhade)  सक्रीय सहभाग नोंदविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.