Telangana : रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री; 7 डिसेंबर रोजी शपथविधी

एमपीसी न्यूज – तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ए रेवंत रेड्डी (Telangana) यांना पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते बनवण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या 7 डिसेंबर रोजी ते तेलंगणा राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करणार आहेत. याबाबत पक्षाचे संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

ते म्हणाले की, आमदारांनी मंजूर केलेल्या ठरावाच्या आधारे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रेड्डी यांच्या नावावर निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंत्रिमंडळात सहभागी नेत्यांची माहिती नंतर दिली जाईल, असे ते म्हणाले.

तेलंगणातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची सोमवारी बैठक झाली, ज्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) नेत्याची नियुक्ती करण्याचे अधिकार देण्यात आले.

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार रेवंत रेड्डी यांना तेलंगणाचे डीके शिवकुमार म्हणतात. त्यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या विरोधात कामरेड्डी आणि कोडंगल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. कामारेड्डी मतदारसंघातून भाजप नेते के वेंकट रामण्णा रेड्डी यांनी त्यांचा पराभव केला. त्याचवेळी ते कोडंगल मतदारसंघातून विजयी झाले.

महबूबनगर जिल्ह्यातील कोंडारेड्डी पल्ली येथे जन्मलेल्या 54 वर्षीय रेवंत यांचे पूर्ण नाव अनुमुला रेवंत रेड्डी आहे. उस्मानिया विद्यापीठातून पदवीधर असलेल्या रेवंत यांनी भाजपची विद्यार्थी संघटना ABVP मधून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2007 मध्ये, ते अपक्ष उमेदवार म्हणून आंध्र प्रदेश विधान परिषदेचे सदस्य देखील निवडून आले.

Alandi : कार्तिकी यात्रे निमित्त ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात वारकरी भाविकांचे अलंकापुरीत आगमन

नंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या निमंत्रणावरून त्यांनी तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) मध्ये प्रवेश केला. 2009 (Telangana) मध्ये, त्यांनी आंध्र प्रदेशातील कोंडगल विधानसभा मतदारसंघातून टीडीपीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि पाच वेळा काँग्रेसचे आमदार असलेले गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला. नायडूंनी त्यांना विधानसभेत पक्षाचे नेतेही केले.

रेवंत काँग्रेसच्या जवळ येत असल्याची चर्चा टीडीपीमध्ये होती. 2017 मध्ये, टीडीपीने त्यांना सभागृह नेतेपदावरून हटवले. रेवंत यांनी काही दिवसांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2018 च्या निवडणुकीत रेवंतने पुन्हा कोडंगलमधून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मलकाजगिरी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पहिल्यांदाच संसदेत पोहोचले. जून 2021 मध्ये काँग्रेस हायकमांडने त्यांना ज्येष्ठ नेते एन. उत्तम रेड्डी यांच्या जागी तेलंगणाची कमान सोपवली. यावर एका गटात फारच असंतोष होता.

कॅश फॉर व्होट प्रकरणात रेवंतही तुरुंगात होते. एलएलसी निवडणुकीत पैसे देऊन मते विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. चालू निवडणुकीतही पैसे घेऊन पक्षाने तिकीट दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. तेलंगणा सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र केटीआर यांनी रेवंत यांना उपहासाने विचारले होते, रेड्डी (तिकीटाचा दर काय आहे?

युनायटेड आंध्र प्रदेशचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांची भाची गीतासोबत रेवंतचा विवाह झाला होता. गीताच्या घरच्यांचा सुरुवातीला विरोध असूनही, रेवंत त्यांच्या प्रेमाला लग्नापर्यंत नेण्यात यशस्वी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.