Alandi : कार्तिकी यात्रे निमित्त ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात वारकरी भाविकांचे अलंकापुरीत आगमन

एमपीसी न्यूज -श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा (Alandi)व कार्तिकी यात्रे प्रारंभ आज दि.5 रोजी वै. गु.हैबतबाबांच्या पायरी पूजनाने झाला.आळंदी मध्ये संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रा 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत हा सोहळा पार पडत आहे.

त्यानिमित्ताने टाळ ,मृदुंगाच्या, हरिनामाच्या गजरात ,खांद्यावर भगवी पताका व डोईवर तुळशी वृंदावन घेत दिंड्याचे अलंकापुरीत आगमन झाले आहे.तसेच आज पंढरपूर हुन विठ्ठलाच्या पालखीचे हरिनामाच्या गजरात आळंदी शहरात आगमन झाले.तद्नंतर माऊलीं मंदिरात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व भगवान विठ्ठलाची भेट झाली.

Chinchwad : ‘भव्य किल्ले बनवा’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण; शहरातील 435 सोसायटयांचा सहभाग

आळंदीत आगमन झालेल्या वारकरी (Alandi)भाविकांनी आपल्या राहण्याच्या सोई सुविधा साठी राहुट्या उभारल्या आहेत.तसेच छोट्या मोठ्या दुकानदारांचे शहरात ठीक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात साहित्य ,वस्तूंची व विविध साहित्याची दुकाने उभारणीची कामे चालू आहे.तर काहींनी उभारलेली आहेत. इंद्रायणी घाट वारकरी भाविकांनी फुलला आहे.

माऊली मंदिरात व महाद्वारात आकर्षक फुलसजावट करण्यात आली आहे. तसेच आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आळंदी शहरात ठीक ठिकाणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानोबा माऊलीच्या नामाच्या गजराने शहर दुमदुमू लागले आहे.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.