Pimpri : पालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांची बढतीने मुंबईत बदली 

जितेंद्र कोळंबे नवीन मुख्य लेखापाल 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांची बढतीने मुंबईत बदली झाली आहे.  मुंबईतील प्राथमिक शिक्षण परिषदेच्या (वित्त व लेखा)सहसंचालकपदी त्यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी पिंपरी पालिकेत जितेंद्र विश्वनाथ कोळंबे यांची वर्णी लागली आहे. वित्त विभागाच्या अवर सचिव माधवी गांधी यांनी आज (शुक्रवारी) बदलीचा आदेश पारित केला आहे. 

नाशिक महापालिकेतून 1 जुलै 2016 रोजी राजेश लांडे यांची पिंपरी महापालिकेत मुख्य लेखापालपदी बदली झाली होती. त्यांना पालिकेत रुजू करुन घेण्यास कर्मचारी महासंघाने विरोध दर्शविला होता. तथापि, काही काळानंतर त्यांचा विरोध मावळला. लांडे यांना पालिकेत दोन वर्ष काम करण्याची संधी मिळाली.

या दोन वर्षाच्या कालावधीत राजेश लांडे यांनी पालिकेला आर्थिक शिस्त लावण्याचा अटोकाट प्रयत्न केला. 31 मार्चनंतर बीले स्वीकरण्याची पालिकेतील चुकीची प्रथा त्यांनी बंद पाडली. त्यामुळे पालिकेला आर्थिक शिस्त लागली. यंदा त्यांनी 31 मार्चपर्यंतच विविध विकास कामे करणा-या ठेकेदार, पुरवठादारांची बीले स्वीकारली होती. याशिवाय विविध चुकीच्या कामांना त्यांनी लगाम लावला होता. विविध विकास कामांमध्ये होणा-या ‘रिंग’ला त्यांनी चाप बसविला होता.

लांडे यांना आत्ता बढती मिळाली आहे. बढतीने मुंबईतील प्राथमिक शिक्षण परिषदेच्या (वित्त व लेखा) सहसंचालकपदी त्यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी पिंपरी पालिकेत जितेंद्र विश्वनाथ कोळंबे यांची वर्णी लागली आहे. वित्त विभागाच्या अवर सचिव माधवी गांधी यांनी आज (शुक्रवारी) बदलीचा आदेश पारित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.