Chinchwad : श्री धनेश्वर विश्वास मंडळ ट्रस्टच्या सदस्यांनी केली श्री किन्नौर कैलाशची अवघड चढाई

कठीण संघर्षाचा सामना करीत हर हर महादेव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Chinchwad) मधील श्री धनेश्वर विश्वास मंडळ ट्रस्टचे सदस्य शैलेश तलाठी, योगेश कंद, प्रतुल सोनवणे, अजित धनवे, तानाजी उफाळे, संदीप नवसुपे, या बंधू मित्रांनी हिमाचल प्रदेशमधील श्री किन्नौर कैलाश २४००० फूट उंचीवरील व ७९ फूट उंचीवर ज्यांचे शिवलींग स्थान आहे अशी यात्रा त्यांनी पूर्ण केली आहे.

Chikhali : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने दीड लाखाची फसवणूक

कैलास मानसरोवर पेक्षा पण कठीण ही यात्रा मानली जाते. पिंपरी चिंचवड शहरातून प्रथमच या यात्रेसाठी हे बंधू गेले आहेत. या मंदिराचा मोठा इतिहास व अख्यायिका प्रचलित आहेत. हवेतील ऑक्सिजनची कमतरता, बर्फवृष्टी व चढाई या सर्वांवर मात करत त्यांनी महादेवांचे २४००० फूट उंचीवर चढत जाऊन दर्शन घेतले आहे.

15 ऑगस्ट रोजी ही यात्रा सुरू झाली असून 26 ऑगस्टला यात्रेचा समारोप होणार आहे. समस्त चिंचवडकर बंधूना याचा सार्थ अभिमान वाटत आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.