Moshi : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – डंपरने पाठीमागील बाजूने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 20) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर मोशी (Moshi) चौक येथे घडली.

संदीप बबन हासे (वय 35, रा. काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी सुनील पंढरीनाथ हासे (वय 44, रा. राक्षेवाडी, ता. खेड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित संजय अंधारे (वय 22, रा. भांडगाव, ता. परांडा, जि. धाराशिव) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ संदीप हासे हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 17/एक्यू 7389) पुणे-नाशिक महामार्गावरून घरी जात होते. मोशी (Moshi) चौक येथे आरोपीने त्याच्या ताब्यातील डंपर (एमएच 25/एके 4555) भरधाव वेगात चालवून संदीप यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात संदीप यांच्या तोंडाला, पोटाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.