Sangvi : पिंपळे गुरवमध्ये एका रात्रीत तीन घरफोडी

एमपीसी न्यूज – रक्षाबंधन निमित्त बाहेर गावी गेल्याचा फायदा घेत पिंपळे गुरव येथील लक्ष्मी नगर येथे चोरांनी तीन घरांनामद्ये घराचा कडीकोयनडा तोडून घरफोडी केली.

घटनास्थळी नेमकी चोरी किती झाली अद्याप समजलेले नसून, पोलीस घटनास्थळी पोहचलेले नाही. पोलीस पंचनामा व चोरी झालेल्या घरातील रहिवासी आल्यावर घटनेची सविस्तर माहिती मिळेल. स्थानिक रहिवासी घटनास्थळी मोठ्या संख्येने उपस्थित असून चोरांनी सीसीटिव्हीची दिशाभूल करुन चोरी केल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.