Pune : घरफोडी,दरोडा व  गोळीबार प्रकरणातील सराईताला बेड्या, गुन्हे शाखेची कारवाई

एमपीसी न्यूज : – पुण्यासह नगर, सोलापूर जिल्ह्यात घरफोडी, तसेच दरोडा घालण्याचे गुन्हे करणारा दरोडेखोराला ( Pune ) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोलिसांच्या पथकावर गोळीबार करुन पसार झालेल्या दरोडेखोराला पकडण्यासाठी सोलापूर आणि नगर पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत होते.

हंसराज रणजीतसिंग टाक (वय 18, रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोराचे नाव आहे.

PCMC : आरोग्याधिकार्‍याला मारहाण करणारा सफाई कर्मचारी निलंबित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेतील युनिट सहाचे पथक हडपसर भागात गस्त घालत होते. त्यावेळी टाक हा कॅनोल रस्ता परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी नितीन मुंढे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून टाक याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने पुणे शहरातील हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले. चौकशीत त्याने 9 गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून, 6 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ( Pune ) आहे.

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share