PCMC : आरोग्याधिकार्‍याला मारहाण करणारा सफाई कर्मचारी निलंबित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या  ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयातील ( PCMC) आरोग्य अधिका-याला बाहेरील लोक आणून मारहाण करणा-या सफाई कर्मचा-याला निलंबित करण्यात आले आहे. त्याची विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी  दिले आहेत.

Pune : मानवाधिकार पुरस्काराने पिंपरी चिंचवड शहरातील दिलासा संस्था सन्मानित

शंकर मुरलीधर सोनवणे असे सफाई कर्मचार्‍याचे नाव आहे. सोनवणे हा इ क्षेत्रीय कार्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. योग्य काम करीत नसल्याने सहायक आरोग्याधिकारी राजेश भाट यांनी त्याला 22 नोव्हेंबरला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नोटीस दिली म्हणून सोनवणे याने बाहेरील लोक आणून भाट यांना दमदाटी, शिविगाळ करीत मारहाण केली.

या घटनेबद्दल सोनवणे याच्या विरोधात भोसरी पोलिस ठाण्यात 5 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला आहे. गैरवर्तन केल्याने तसेच, शिस्तभंग केल्याने महापालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे आयुक्त सिंह यांनी सोनवणे याचे सेवानिलंबन केले आहे. तसेच, विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले ( PCMC) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.