Today’s Horoscope 06 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग -Today’s Horoscope  06 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – मंगळवार.

तारीख – 06.02.2024.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष – षटतिला एकदशी.

राहू काळ – दुपारी 03.00  ते 04.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – ज्येष्ठा 7.35  पर्यंत नंतर मूळ.

चंद्र राशी – वृश्चिक 7.35 पर्यंत नंतर धनु.

—————————–

मेष – ( शुभ रंग – राखाडी)

उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने विरोधी दिवस आहे. नवीन उपक्रमांची सुरुवात उद्याच करा. वरिष्ठांनी विचारलेल्या प्रश्नांची थोडक्यातच उत्तरे द्या. आज देव नवसाला पावेल.

वृषभ – ( शुभ रंग- पिस्ता)

व्यावसायिक निर्णय घेताना भागीदारांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आज घरगुती निर्णय घेतानाही जोडीदाराचे मत नक्की विचारात घ्या. आज मोठे आर्थिक व्यवहार टाळा.

मिथुन – ( शुभ रंग- क्रीम)

कार्यक्षेत्रात आज समोर येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती यशस्वी होतील. विवाह विषयक बोलणी सकारात्मक रित्या पार पडतील.

कर्क – ( शुभ रंग – पांढरा)

नोकरदारांवर कामाचा ताण वाढेल. वरिष्ठ आज गोड बोलून राबवून घेतील. दुकानदारांची उधारी वसूल होऊ शकेल. आज तब्येत सांभाळा थोडी विश्रांती ही गरजेची आहे.

सिंह -( शुभ रंग – आकाशी)

कला क्षेत्रात नवोदितांना उत्तम संधी मिळतील. खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील. सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील. व्यक्तिमत्व विकासावर तुम्ही भर द्याल.

कन्या – ( शुभ रंग- डाळिंबी)

स्थावर प्रॉपर्टी विषयक खरेदी विक्रीची रखडलेली कामे गती घेतील. गृहिणी घर सजावटीच्या वस्तूंची खरेदी करतील. मुले आज मन लावून अभ्यास करतील.

तूळ – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. पैसा खर्च करण्याचे विविध मार्ग सुचतील. मुलांच्या ऑनलाईन अभ्यासात आज पालकांनीही डोकावणे गरजेचे राहील.

वृश्चिक ( शुभ रंग – जांभळा)

कार्यक्षेत्रातील तुमची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालू राहील. पैशाअभावी रखडलेले पूर्वीचे उपक्रम सुरू करू शकाल. आज तुम्ही सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरतील.

धनु – (शुभ रंग- सोनेरी)

आज तुम्ही आनंदी व उत्साही असाल. तुमचे कामातील समर्पण इतरांना प्रेरणा देईल. वेळेचे योग्य नियोजन केल्याने आज कार्यक्षेत्रात यशाचा मार्ग सोपा होईल.

मकर – (शुभ रंग- आकाशी)

व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना तुम्ही यशस्वीपणे कराल. आज काही महत्त्वाच्या कामांना विलंब होईल. इतरांवर अवलंबून राहू नका. आज स्वावलंबनच कमी येईल.

कुंभ – (शुभ रंग- आकाशी)

कोणत्याही नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी आज अति उत्तम दिवस आहे. काही अनपेक्षित लाभ तुमचा कार्य उत्साह वाढवतील. इतरांना दिलेले शब्द पाळता येतील.

मीन – ( शुभ रंग- केशरी)

नोकरदारांना अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. घरात आज वडीलधारी मंडळी ही आपलेच खरे करतील. सरकारी नियम मोडणे अंगाशी येऊ शकते. शिस्त पाळा.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.