Today’s Horoscope 07 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 07 January 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

वार – शनिवार

07-01-2023
शुभाशुभ विचार- 9 पर्यंत चांगला दिवस.
आज विशेष- सामान्य दिवस.
राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आजचे नक्षत्र – पुनर्वसू.
चंद्र राशी – मिथुन 20.14 पर्यंत नंतर कर्क.
—————————————-

मेष – ( शुभ रंग- राखाडी )

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली कराव्यात. आज कार्यक्षेत्रात काही तुमच्या मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे. आज घराबाहेर वावरताना रागावर ताबा ठेवायला हवा. हितशत्रू सक्रिय आहेत, तुम्ही सतर्क रहा.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी  )

दिवसाच्या पूर्वार्धातच काही येणी असतील तर अनपेक्षित पणे वसूल होतील. नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील. आज शक्य असल्यास प्रवासाची दगदग टाळा.

मिथुन ( शुभ रंग- केशरी )

कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झोपणारी कामे आज सहजच पूर्ण कराल व्यापाऱ्यांची आवक मुबलक असेल. आज तुमच्यातील मीपणा वाढण्याची शक्यता आहे.

कर्क (शुभ रंग- मोरपंखी ) Today’s Horoscope 07 January 2023

आज भावनेच्या भरात कुणाला कसलीही वचने देऊ नका. दानधर्म करतानाही आधी आपली शिल्लक तपासून घ्या. आज आर्थिक व्यवहारात सावध असणे आवश्यक आहे.

सिंह (शुभ रंग- लाल )

आज कार्यक्षेत्रात तुमच्यासाठी अनुकूल वातावरण असेल. नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या प्रभावात असतील. अधिकारांचा गैरवापर टाळून आज फक्त कर्तव्यास प्राधान्य द्या.

कन्या ( शुभ रंग- सोनेरी )

आज नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठानकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. तुमच्या अधिकारातही वृद्धी होईल. एखादी वाढीव जबाबदारी स्वीकारून ती पूर्णही कराल.

तूळ ( शुभ रंग- मरून )

आज तुम्हाला हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल पण तसे करू नका. प्रलोभने टाळा. स्वतःवर संयम ठेवा. नोकरी संदर्भात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल.

Moshi : 36 वर्षानंतर जन्मली मुलगी; गुप्ता कुटुंबीयांनी केले जंगी स्वागत

वृश्चिक (शुभ रंग- क्रीम )

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकलावेत. ज्येष्ठ मंडळींनी मनःशांतीसाठी सत्संगाकडेच वळावे.

धनु- (शुभ रंग- निळा ) Today’s Horoscope 07 January 2023

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करावे लागतील. व्यवसायात भागीदारांशी सामंजस्याचे वातावरण राहील.

मकर ( शुभ रंग- डाळिंबी )

नोकरदारांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच असेल. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील मतभेद सामंजस्याने मीटू शकतील.

कुंभ (शुभ रंग – जांभळा )

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची ही उत्तम साथ मिळेल. आज काही बिकट प्रश्न चुटकीसरशी सुटतील. आज कार्यक्षेत्रात तुमचा उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. तब्येतीची मात्र काळजी घ्या

मीन -(शुभ रंग – चंदेरी )

व्यापार उद्योगास चांगली गती येईल महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर तुम्ही ठाम राहणार आहात. स्थावरची खरेदी विक्री फायद्यातच राहील. एकतर्फी प्रेमास समोरून प्रतिसाद मिळेल.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी

ज्योतिष व वास्तु सल्लागार

संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.