Today’s Horoscope 11 October 2022 : जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग – Today’s Horoscope 11 October 2022
मंगळवार.
तारीख 11.10.2022
शुभाशुभ विचार- चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी 3.00 ते 4.30
दिशा शूल- उत्तरेस असेल.
आजचे नक्षत्र- अश्विनी 16.17 पर्यंत नंतर भरणी.
चंद्र राशी- मीन 16.02 पर्यंत नंतर मेष.
————————————–
मेष – शुभ रंग – पिस्ता
आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा हट्ट असेल आपला मोठेपणा सांभाळण्यासाठी आवाक्या बाहेर खर्चही कराल. फारच सडेतोड बोलून कोणाच्या भावना मात्र दुखावू नका

वृषभ – शुभ रंग – भगवा
काहींना अर्जंट दूर से प्रवास घडणार आहेत. वायफळ खर्चाचे प्रमाण आज वाढेल. प्रवासात आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे, खाण्यापिण्यावर ताबा ठेवायला हवा

मिथुन – शुभ रंग – केशरी (Today’s Horoscope 11 October 2022)
तुमची व्यावसायिक उलाढाल वाढेल. नवविवाहितांची स्वप्न साकार होतील. जिवलग मित्र तुमच्या शब्दाला किंमत देतील. दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील. दिवसाचा उत्तरार्ध लाभाचा.

कर्क – शुभ रंग – मरून
आपल्या कार्यक्षेत्रामध्ये वाढत्या स्पर्धेचा सामना करावाच लागणार आहे. अधिकारी वर्गास अधिकार वापरावेच लागतील. आज मित्रांच्या फार नादी लागू नका. कर्तव्यास प्राधान्य द्या.

सिंह – शुभ रंग – क्रीम
उद्योगधंद्याच्या दृष्टीने काहीसा प्रतिकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळणे अवघड जाईल. नास्तिकही आज देवाला एखादा नवस बोलून बघतील.

कन्या – शुभ रंग – गुलाबी
आज धाडसाची कामे टाळावीत झटपट लाभाचा मोह तर नकोच. विवाह विषयक बोलणी आज नकोत. जास्त लाभाच्या अशाने कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका.

तूळ – शुभ रंग – चंदेरी
व्यवसायात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तुम्ही सज्ज असाल. समोर होणारी प्रत्येक व्यक्ती आज तुमच्याच प्रभावाखाली राहील. पत्नीचे सल्ले मात्र डावलू नका.

वृश्चिक – शुभ रंग – क्रीम
नोकरदारांसाठी अनुकूल दिवस असून वरिष्ठ आज तुमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील. तुमची काही येणी असतील तर वसूल होण्याची शक्यता आहे.

धनु – शुभ रंग – निळा
तरुण मंडळींचा आज मौज मजा करण्याकडे कल असेल. स्वतःची हाऊस भागवण्यासाठी खर्च कराल. गृहिणी आज स्वतःसाठी वेळ काढतील. प्रकृती आज धडधकट राहील.

मकर – शुभ रंग – भगवा
नोकरदारांना ऑफिसला दांडी मारायचा मूड असेल. मुलांची अभ्यासात चांगली प्रगती दिसून येईल. कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. गृहिणींना दिवाळीचे वेध लागतील.

कुंभ – शुभ रंग – आकाशी
कार्यालयीन कामानिमित्त प्रवास घडतील. साहित्यिक मंडळींकडून दर्जेदार लिखाण होईल. गायक कलाकार प्रसिद्धीच्या झोतात येतील. गृहिणी शेजारधर्म जपातील.

मीन – शुभ रंग – लाल
कार्यक्षेत्रात तुमच्या वक्तृत्वाचा चांगला प्रभाव राहील. व्यवसायात आज आवक मनासारखी असेल. नोकरीच्या ठिकाणी एखादी वाढीव जबाबदारी आत्मविश्वासाने स्वीकाराल.

शुभम भवतु

श्री जयंत बाळकृष्ण कुलकर्णी
( ज्योतिष व वास्तु सल्लागार)
फोन 9689165424

शासकीय योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे उद्दीष्ट समोर ठेवून काम करा : संजय मल्होत्रा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.