Today’s Horoscope 16 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 16 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शनिवार.

16.09.2023.

शुभाशुभ विचार-चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – सकाळी 09.00 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी 07.36 पर्यंत नंतर हस्त.

चंद्र राशी – कन्या.

————————————

मेष – ( शुभ रंग- जांभळा )

आज तुमच्या कार्यक्षेत्रात काही आव्हान देणारे पेच प्रसंग तुम्हाला सोडवावे लागतील वैवाहिक जीवनात सौम्य मतभेद राहतील. भागीदारी व्यवसायात आर्थिक व्यवहार लिखित स्वरूपात करा.

वृषभ (शुभ रंग- डाळिंबी )

महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. आज रुग्णांना असाध्य आजारावर योग्य उपाय सापडेल. मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून पालक आनंदी होतील.

मिथुन ( शुभ रंग- आकाशी )

आज तुम्हाला तुमची खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील. हाती असलेला पैसा जपून वापरा. भावनेच्या भरात कुणालाही वचने देऊ नका. मुलांचे अति लाड थांबवा.

कर्क (शुभ रंग- पांढरा)

नोकरदारांना त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांना लोकप्रियता मिळेल. कुटुंबीयांस अभिमानास्पद वाटणारी अशी कामगिरी आज तुमच्या हातून होईल.

सिंह (शुभ रंग- पिस्ता )

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह वाटेल. आज लहान भावाला कदाचित तुमच्या मदतीची गरज भासेल.

कन्या ( शुभ रंग- लाल )

आज तुम्ही हट्टीपणाने वागाल सडेतोड बोलल्याने आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली असली तरीही पैशाची उधळपट्टी करून चालणार नाही.

तूळ ( शुभ रंग- राखाडी )

आज विविध मार्गाने येणारा पैसा विविध मार्गाने जाईल. दूरच्या प्रवासात आपल्या किमती वस्तू सांभाळा. घरात पूर्वी हरवलेली एखादी वस्तू आज संध्याकाळी सापडू शकेल.

वृश्चिक (शुभ रंग- निळा)

आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णय योग्य ठरतील. मित्र तुम्हाला दिलेली आश्वासने पाळतील. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार दिवसाच्या पूर्वार्धात उरकणे गरजेचे आहे.

धनु- (शुभ रंग- सोनेरी)

उच्चशिक्षितांना आज मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घ्यायला मात्र विलंब लावू नका. आज वरिष्ठांकडून तुमच्या रस्त मागण्या मान्य होतील. छान दिवस आहे.

मकर ( शुभ रंग- भगवा )

आज ऑफिसमध्ये अधिकारी वर्गास काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर आज ध्येयाकडे तुम्ही वेगाने वाटचाल कराल. कायद्याची चौकट मात्र मोडू नका.

कुंभ (शुभ रंग – क्रीम )

कार्यक्षेत्रात घडलेल्या काही मनाविरुद्ध घटनांनी तुम्हाला नैराश्य येऊ शकते. आज वरिष्ठांशी नमते घ्या व सहकार्यांशी जुळवून घ्या. वाहन चालवताना ओव्हरटेक करू नका.

मीन -(शुभ रंग – पिस्ता )

आज आपल्या मर्यादित रहा अति आक्रमकतेने नुकसान होईल. संध्याकाळी वाहन चालवताना जरा जपून. मुलांनी कुसंगती पासून लांब राहावे पालक हिताचे सांगतील.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.