Todays Horoscope 17 February 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार गुरुवार , दि. 17.02.2022

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – गुरुप्रतीपदा.
राहू काळ – दुपारी 01.30 ते 03.00.
दिशा शूल – दक्षिणेस असेल.
आजचे नक्षत्र – मघा 16.11 पर्यंत, नंतर पूर्वा फाल्गुनी.
चंद्र राशी – सिंह.
_________________________
आजचे राशीभविष्य

मेष ( शुभ रंग -पांढरा)

आज सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय, तसेच स्टेशनरीचे व्यवसाय तेजीत चालतील. नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. विद्यार्थ्यांना एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल.

वृषभ (शुभ रंग पिस्ता)

काही दुरावलेली नाती आज नव्याने जवळ येणार आहेत. गृहिणींना आज आर्थिक अडचणींवर मात करण्यास पूर्वीची बचत कामी येईल. कलाकारांना स्ट्रगल वाढवावी लागेल.

मिथुन ( शुभ रंग भगवा)

उद्योग-धंद्यात काहीशी प्रतिकूलता जाणवेल. जाहिरातीवर चा खर्च वाढवावा लागेल. काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल. शेजाऱ्यांच्या मदतीने काही कामे सोपी होतील.

कर्क – ( शुभ रंग – मरून)

मित्र आज दिलेली आश्वासने पाळतील. हाती पुरेसा पैसा असल्याने मनासारखा खर्चही करू शकाल. जिथे जाल तिथे आपली मर्जी चालवाल. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.

सिंह (शुभ रंग -स्ट्रॉबेरी)

वैवाहिक जीवनात आज एकमत असून कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम असेल. जोडीदारास आज एखादे सरप्राईज गिफ्ट द्याल. भविष्याच्या दृष्टीने सुरक्षित गुंतवणूक करण्याकडे कल असेल.

कन्या ( शुभ रंग- क्रीम)

महत्त्वाच्या कामांना विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच राहील. हाती असलेले पैसे आज जपून वापरा. संध्याकाळी एखाद्या मोठा खर्च उद्भवण्याची शक्यता आहे.

तूळ (शुभ रंग- सोनेरी)

आज तुमच्या कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. मानसिक शांतता लाभेल व तुमचे आरोग्य ही उत्तम राहील. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा आकस्मिक धनलाभ संभवतो.

वृश्चिक (शुभ रंग- चंदेरी)

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे दडपण जाणवेल. भावना व कर्तव्य यात मनाची थोडी ओढाताण होणार आहे. आणि आज तुम्ही कर्तव्यासच  अधिक प्राधान्य देणार आहात.

धनु (शुभ रंग- डाळिंबी)

उच्च शिक्षतांना परदेशगमनाच्या संधी दृष्टिक्षेपात येतील. आज महत्त्वाचे निर्णय घेताना मात्र तुमची द्विधा मनस्थिती होणार आहे. नास्तिक मंडळीही आज गरजेपुरती अध्यात्मिक होतील.

मकर (शुभ रंग- निळा)

आज कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडू शकतील. काही अटीतटीच्या प्रसंगी संयम महत्त्वाचा राहील. वाहन चालवताना शिस्त पाळणे आवश्यक आहे.

कुंभ (शुभ रंग- आकाशी)

आज तुमच्या कौटुंबिक सुखात वृद्धिच होईल. जोडीदाराकडून असलेल्या तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. मोठ्या आर्थिक उलाढाली यशस्वी होतील. वैवाहिक जीवनात आज तू तिथे मी.

मीन ( शुभ रंग- जांभळा)

आज काही आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल. खाण्यापिण्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. प्रामाणिक मेहनतीस आज दैवाची उत्तम साथ मिळेल.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४.
( ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.