Today’s Horoscope 19 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज  –  Today’s Horoscope 19 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस- सोमवार.

तारीख – 19.02.2024.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष – छत्रपती शिवाजी महाराज जयंती.

राहू काळ – सकाळी 7.30 ते  09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – मृग 10.33 पर्यंत नंतर आर्द्रा.

चंद्र राशी – मिथुन.

—————————–

मेष – ( शुभ रंग – राखाडी)

आज नोकरदारांना बढती बदली विषयी समाचार येऊ शकतात. मुले आज अभ्यासात चालढकलच करतील. गृहिणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा करू नये.

वृषभ – ( शुभ रंग- मोरपंखी)

आज खिशात पैसा खेळता असल्याने आनंदी व उत्साही असाल. काही हवेहवेसे वाटणारे पाहुणे घरी पायधुळ झाडतील. आज खरे बोलण्यापेक्षा गोड बोलणे हिताचे राहील.

मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता)

आज स्वतःचेच खरे करू नका. इतरांचाही ऐकून घेणे गरजेचे आहे. व्यावसायिकांनी स्पर्धकांना कमजोर समजू नये. गोडबोल्या मंडळींचे गोड बोलणे फार मनावर घेऊ नका.

कर्क – ( शुभ रंग – तांबडा)

आजचा दिवस खर्चाचा आहे. काही थकीत सुलभ हप्ते भरावे लागणार आहेत. कार्यालयीन कामासाठी प्रवास होतील. महत्त्वाच्या चर्चेत सुसंवादाचे धोरण ठेवलेले बरे.

सिंह – ( शुभ रंग – राखाडी)

आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात पडण्याची शक्यता आहे. वेळीच योग्य निर्णय घ्याल व वेळेचे योग्य नियोजन कराल.

कन्या – ( शुभ रंग- जांभळा)

आज तुम्ही भावने पेक्षा जास्त कर्ताव्यास प्राधान्य द्याल. कामाच्या व्यापात आज महत्त्वाचे घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील. संध्याकाळी सहकुटुंब मौजमजेस प्राधान्य द्याल.

तूळ – ( शुभ रंग- क्रीम)

आज दैवाचे पाठबळ उत्तम असल्याने तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळेल. सज्जनांचा सहवास लाभेल. सरकारी कामे मात्र रखडतील. गृहिणी दानधर्म करतील.

वृश्चिक –  ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

कोणतीही धाडसाची कामे आज नकोत. स्वतःला जपा. आज कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. विश्वासातील व्यक्तींकडूनच विश्वासघात होऊ शकतो.

धनु – (शुभ रंग- निळा)

कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य असल्याने तुमचे मनोबल ही उत्तम असेल. आज जोडीदाराचे हट्ट पुरवण्याचा प्रयत्न कराल. संध्याकाळी सहकुटुंब सहपरिवार चैन कराल.

मकर –  (शुभ रंग- लाल)

कोणतीच गोष्ट सहज साध्य नसली तरीही आज तुमच्या प्रयत्नांना दैवाचे पाठबळ नक्की मिळेल. काही थकीत येणी असतील तर दिवसाच्या उत्तरार्धात वसूल होऊ शकतील.

कुंभ – (शुभ रंग- केशरी)

हौशी मंडळी जीवाची मुंबई करतील. आज मनसोक्त स्वतःचे लाड पुरवण्यासाठी वेळ व पैसाही खर्च कराल. गूढ शास्त्राच्या अभ्यासकांना एखादी प्रचिती येईल.

मीन –  ( शुभ रंग- गुलाबी)

आज तुम्हाला आपले सोडून इतरांच्या भानगडीत डोके घालावेसे वाटेल. पण तसे न करता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे हिताचे राहील. आज व्यर्थ वाद टाळा.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.