Today’s Horoscope 20 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 20 May 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – शनिवार

20.05.2023.

शुभाशुभ विचार- करिदिन.

आज विशेष- दशहरारंभ.

राहू काळ – सकाळी 09.00 ते  10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आजचे नक्षत्र – कृत्तिका 08.03 पर्यंत नंतर रोहिणी.

 चंद्र राशी –  वृषभ.

———————–—————–

मेष – ( शुभ रंग- मोरपिशी )

दिवसाच्या पूर्वार्धातच काही येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील. आज प्रवासाची दगदग टाळावी.

वृषभ (शुभ रंग- चंदेरी )

आज व्यापाऱ्यांची आवक मुबलक असेल. कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झोपणारी कामे आज तुम्ही सहजच पूर्ण कराल. इतरांचेही ऐकून घेण्याची तयारी ठेवा.

मिथुन ( शुभ रंग- राखाडी )

एकावर विसंबून दुसऱ्याला शब्द देऊन अडकू नका. मोठ्या आर्थिक व्यवहारात सावध असणे अत्यंत गरजेचे आहे. दानधर्म करतानाही आधी आपली शिल्लक तपासून घ्या.

कर्क (शुभ रंग- सोनेरी.)

नोकरीच्या ठिकाणी आज तुमच्या मनासारख्या काही घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळा.

सिंह (शुभ रंग- हिरवा )

नोकरीच्या ठिकाणी तुमचा बढतीचा मार्ग सोपा होईल. अधिकार योग चालून येतील. कोणतेही काम करताना सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. वडील आज तुम्हाला योग्य सल्ले देतील.

कन्या ( शुभ रंग- डाळिंबी)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने तुम्हाला नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल पण तसे करू नका. प्रलोभने टाळा स्वतःवर संयम असू द्या.

तूळ ( शुभ रंग- पांढरा)

आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज जेष्ठ मंडळींना सत्संगातून मनःशांती मिळेल.

वृश्चिक (शुभ रंग- आकाशी )

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी.

धनु- (शुभ रंग- निळा)

नोकरदारांवर वरिष्ठांचा वरदहस्त राहील. आज तब्येत तुमची थोडीशी नरमच असेल. जुनी दुखणी अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर सौम्य होतील.

मकर ( शुभ रंग- जांभळा )

तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची ही उत्तम साथ मिळेल. आज काही बिकट प्रश्न चुटकीसरशी सुटतील. प्रेमाच्या हाकेस प्रतिसाद मिळेल. आज उत्साह पूर्ण दिवस.

कुंभ (शुभ रंग – क्रीम)

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आपल्या मतावर आज तुम्ही ठाम राहाल. स्थावरची खरेदी विक्री फायद्यातच राहील. मातोश्रींकडून आज काही लाभ होईल.

मीन -(शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडू शकतात. आज घराबाहेर वावरताना रागावर नियंत्रण ठेवा.

शुभम भवतु
श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क -9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.