Today’s Horoscope 23 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 23 April 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

23.04.2023

शुभाशुभ विचार- उत्तम दिवस

आज विशेष- विनायक चतुर्थी.

राहू काळ – सकाळी 04.30 ते 06.00.

दिशा शूल- पश्चिमेस असेल.

आजचे नक्षत्र – रोहिणी.

चंद्र राशी – वृषभ.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- राखाडी )

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात इतरांना अशक्य असलेले तुम्ही शक्य करून दाखवाल. आज वाणीत गोडवा ठेवून विरोधकांनाही आपलेसे कराल.

वृषभ (शुभ रंग- गुलाबी )

कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठांनी सोपवलेल्या वाढीव जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आज एखाद्या महत्त्वाच्या चर्चेत इतरांचेही म्हणणे ऐकून घ्यायची तयारी ठेवा.

मिथुन ( शुभ रंग- डाळिंबी )

आज घरात वडीलधाऱ्यांची मने सांभाळावी लागतील. कोणतेही आर्थिक व्यवहार सावधपणे करायला हवेत. दूरच्या प्रवासात बेसावध राहून चालणार नाही.

कर्क (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

आज काही तुमच्या मनासारख्या घटना घडतील. नोकरीच्या ठिकाणी बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. प्रिय मित्र मैत्रिणींच्या सहवासात आजची संध्याकाळ आनंदात जाईल.

सिंह (शुभ रंग- केशरी )

नोकरीच्या ठिकाणी सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकारांचा गैरवापर मात्र टाळा. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांना वेळ देणे अवघड होणार आहे.

कन्या ( शुभ रंग- पांढरा)

नवीन व्यवसायात मर्यादा ओळखूनच आर्थिक उलाढाली कराव्यात. आत्मविश्वासाचा अतिरेक नुकसानास कारणीभूत ठरू शकतो. ज्येष्ठ मंडळींनी उपासने खंड पडून देऊ नये.

तूळ ( शुभ रंग- पिस्ता)

कोणतेही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. व्यवसायात भागीदारांशी मतभेद संभवतात. वैवाहिक जीवनात भांड्याला भांडे लागेल. काळजी घ्या.

वृश्चिक (शुभ रंग- मरून)

आज तुमच्या कामातील उत्साह पाहून तुमचे विरोधकही प्रभावित होतील. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. वैवाहिक जोडीदाराशी आज चांगले सूर जुळतील.

धनु- (शुभ रंग- आकाशी)

आज तुमची तब्येत थोडी नरमच राहील. काही जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. येणी असतील तर आज अनपेक्षित पणे वसूल होतील. प्रवासात मात्र सावध असावे.

मकर ( शुभ रंग- मोरपंखी )

एखाद्या समारंभात तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा चांगला प्रभाव पडेल. एकतर्फी प्रेमाला समोरून होकार मिळेल. कलेच्या क्षेत्रात नवोदितांना उत्तम संधी चालून येतील.

कुंभ (शुभ रंग – हिरवा)

शालेय उपयोगी वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. कलाकारांना यश सोपे नाही. स्ट्रगल वाढवावी लागणार आहे गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.

मीन -(शुभ रंग – जांभळा )

ऑफिसच्या कामानिमित्त प्रवास घडतील. बेरोजगारांना नोकरीचे कॉल्स येतील. आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामाला लागा. आईच्या तब्येतीची विचारपूस नक्की करा.

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तु सल्लागार.
संपर्क 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.