Today’s Horoscope 25 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 25 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस- रविवार.

तारीख  25.02.2024.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस.

आज विशेष – गुरु प्रतिपदा.

राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 06.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – पूर्वा फाल्गुनी 25.24 पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी.

चंद्र राशी – सिंह.
—————————–
मेष – ( शुभ रंग – राखाडी)

नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी उत्तम संधी चालून येतील. नवोदित कलाकारांची प्रसिद्धीची हाऊस भागेल. जीवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल.

वृषभ – ( शुभ रंग- डाळिंबी)

स्थावर शेतीवाडी संबंधित रखडलेले व्यवहार मार्गी लागतील. गृह उद्योग करणाऱ्या महिलांना कर्ज मंजुरी होऊ शकते. मुलांकडून पालकांच्या अपेक्षा पूर्ण होतील.

मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता )

आज प्रत्यक्ष कृतीपेक्षा रिकामटेकड्या गप्पांमध्ये तुमचा बराच वेळ फुकट जाईल. सामाजिक कार्यकर्ते गरजूंच्या कामी येतील. आज शेजारी आपलेपणाने डोकावतील.

कर्क – ( शुभ रंग – पांढरा)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने मुलांचे हट्ट तुम्ही हौशीने पुरवाल. अनपेक्षित येणाऱ्या पाहुण्यांची उठबस अगत्याने कराल. आज मोजकेच बोलणे प्रभावी राहील.

सिंह -( शुभ रंग – मरून)

आज तुम्ही स्वतःच्याच प्रेमात राहाल. कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा प्रयत्न असेल. तरी महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय मात्र अनुभवींच्या सल्ल्याने घ्या.

कन्या – ( शुभ रंग- हिरवा)

कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना जमाखर्चाची गणिते बिघडणार आहेत. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. कलाकारांचा परदेशात नावलौकिक होईल. प्रवास होतील.

तूळ -( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

लाभातील चंद्र तुमच्या मनातील एखादी अपुरी इच्छा पूर्ण करेल. मुला-मुलींचे विवाह योग जुळून येतील. आज शुभ चिंता म्हणजे शुभच होईल. वाणित गोडवा असूद्या.

वृश्चिक- ( शुभ रंग – निळा)

मित्रमंडळींना आज दुरूनच रामराम करून तुम्ही आपल्या ध्येयप्राप्तीस प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व सिद्ध कराल. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील.

धनु-  (शुभ रंग- जांभळा)

महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात थोरा मोठ्यांचे मत अवश्य घ्या. आज काही आक्रमकता नुकसानास कारणीभूत ठरू शकेल. कायद्याची चौकट मोडणे महागात पडेल.

मकर- (शुभ रंग- केशरी)

नवीन व्यवसायात भागीदारांमध्ये काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होऊ शकतात. जोडीदाराच्या चुका काढण्याची चूक आज तरी करू नका. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करा.

कुंभ – (शुभ रंग- मोरपिशी)

कुटुंबात आज खेळीमळीचे वातावरण असेल. आज जोडीदाराचे हट्ट पुरवण्यास तुम्ही प्राधान्य द्याल. व्यवसायात भागीदारांमध्ये सुसंवाद असून योग्य निर्णय घेऊ शकाल.

मीन – ( शुभ रंग- आकाशी)

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामातील समर्पणाची दखल घेतील. ज्येष्ठ मंडळींना आज काही आरोग्य विषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.