Todays Horoscope 5 January 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आजचे पंचांग – वार बुधवार, दि. 05.01.2022

  • शुभाशुभ विचार – शुभ दिवस.
  • आज विशेष – सामान्य दिवस.
  • राहू काळ – दुपारी 12.00 ते 01.30.
  • दिशा शूल – उत्तरेस असेल.
  • आजचे नक्षत्र – श्रवण 08.40 पर्यंत नंतर धनिष्ठा.
  • चंद्र राशी – मकर 19.54 पर्यंत नंतर कुंभ.
  • ————————————–

आजचे राशीभविष्य – 

मेष – ( शुभ रंग – सोनेरी)

धंद्यातील येणी वसूल झाल्याने नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढेल. कार्यक्षेत्रात स्वतःचे महत्त्व निर्माण करू शकाल. नोकरदारांच्या बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील.

वृषभ – ( शुभ रंग- राखाडी)

आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. विरोधकांना चहा पाजूनच आपला कार्यभाग साधून घेणे हिताचे राहील. आज जरा युक्तीने वागा.

मिथुन- ( शुभ रंग- डाळिंबी)

आज जोखमीची कामे टाळलेलीच बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्याच्या मागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट मोडू नका.

कर्क- ( शुभ रंग – स्ट्रॉबेरी )

आज तुम्ही अगदी सहज घेतलेले निर्णय ही योग्य ठरतील. व्यवसायातील स्पर्धकांना ही तुमचा हेवा वाटेल. आज पत्नीच तुम्हाला योग्य सल्ले देईल.

सिंह- ( शुभ रंग- गुलाबी )

कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. आज विरोधकांशी सामंजस्याने घेणे गरजेचे आहे.

कन्या-( शुभ रंग पांढरा )

तरुणांनी मौज मजा करताना कायद्याचे भान ठेवावे. बेफिकीर पणास लगाम गरजेचा आहे. व्यसने घात करतील. कला क्षेत्रातील मंडळींना मेहनतीचे फळ मिळेल.

तूळ-( शुभ रंग- पिस्ता)

आज स्थावर, शेतीवाडी संबंधित व्यवहार फायद्याचे ठरतील. कलाकारांना मात्र रिकाम्या खुर्च्या बघाव्या लागतील. गृहिणी गप्पांमधून गैरसमज पसरवतील.

वृश्चिक – (शुभ रंग- मोरपिशी)

भावनेच्या भरात कोणाला वचने देऊ नका. कितीही चांगले संबंध असले तरी कुणाला जामीन राहू नका. आज लहान भावाला तुमच्या मदतीची गरज भासेल.

धनु- ( शुभ रंग- जांभळा)

रिकाम्या चर्चेतून वाद होतील. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणालात तर वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील. नवविवाहितांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

मकर-( शुभ रंग- नारिंगी)

आज प्रत्येक कामात विलंब ठरलेलाच आहे. व्यवसायात वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल.

कुंभ – (शुभ रंग- मरून)

अनाठायी खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासात दगदग होईल. बेरोजगारांनी घरापासून लांब जायची तयारी ठेवायला हवी. एखाद्या सुरक्षित आर्थिक गुंतवणुकीचा विचार कराल.

मीन – ( शुभ रंग- चंदेरी)

आज आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी मोठ्या लोकांच्या ओळखी वापराल. मित्रही आज दिलेले शब्द पाळतील. एखादी मोठी रक्कम हाती येण्याची शक्यता आहे. आज स्वप्नपूर्तीचा दिवस.

!! शुभम भवतु!!
श्री जयंत कुलकर्णी.
फोन ९६८९१६५४२४
( ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.