Twitter Logo News : ट्विटरचा लोगो बदलला; आता चिमणी एवजी दिसणार कुत्रा

एमपीसी न्यूज – अमेरिकन अब्जाधीश असलेले (Twitter Logo News) एलन मस्क (elon musk) यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर (micro blogging site twitter) विकत घेतली. त्यानंतर त्यांनी केलेल्या अनेक बदलांमुळे मस्क नेहमी चर्चेत राहिले. मस्क यांनी मंगळवारी (दि. 3) एक मोठा बदल ट्विटरवर केला आहे. ट्विटरचा लोगो (twitter logo) बदलून ‘ब्ल्यू चिमणी’ एवजी कुत्र्याचा लोगो (Doge) लावण्यात आला आहे.

ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्क यांनी ब्ल्यू टिक शुल्क (blue tick charges), कर्मचारी कपात, सीईओ पराग अग्रवाल (ceo parag agrawal) यांची हकालपट्टी असे अनेक निर्णय घेतले. त्याच क्रमवारीत ट्विटरचा लोगो बदल देखील येत आहे. लोगो बदलल्यानंतर मस्क यांनी एका युजरला ट्विटमध्ये सांगितले की, ‘मी ते वचन दिले होते ते पूर्ण केले.’

https://twitter.com/elonmusk/status/1642962756906418176?s=20

क्रीप्टोकरन्सीमधून आला ट्विटरचा नवा लोगो ‘डॉग’ साॅफ्टवेअर अभियंते बिली मार्कस ( Billy Markus) आणि जॅॅक्सन पामर ( Jackson Palmer) यांनी सन 2013 मध्ये डॉजकॉईन (Dogecoin) ही क्रीप्टोकरन्सी (cryptocurrency) सुरु केली. एलन मस्क यांनी या करन्सीच्या समर्थनार्थ फेब्रुवारी २०२२ मध्ये अनेक ट्विट केले. त्यावेळी त्यांनी पहिल्या ट्विट मध्ये केवळ ‘DOGE’ एवढेच लिहिले होते.

 

मस्क यांनी डॉजकॉईन बाबत वेळोवेळी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे या करन्सीची किंमत देखील वाढली. त्यानंतर आता मस्क यांनी करन्सीचा लोगो थेट (Twitter Logo News) ट्विटरला देऊन आणखी एक सकारात्मक पाऊल टाकले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.