Pune News : संजय राऊत यांच्या आरोपाला कधीच गांभीर्याने घ्यायच नसतं-चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – संजय राऊत यांच्या आरोपाला कधीच ( Pune News ) गांभीर्याने घ्यायच नसतं,असे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.शिंदे गटाचे नेते मंत्री दादा भूसे आणि आमदार राहुल कूल यांच्यावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

त्याकडे मागणी देवेंद्र फडणवीस लक्ष देत नसून भेटीची देखील वेळ मागितली.पण ती देखील टाळत आहे; असा आरोप संजय राऊत यांनी केला , याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.

PCMC: महापालिकेच्या 40 कनिष्ठ अभियंत्यांना बीट निरीक्षकांचीही कामे करावी लागणार

देवेंद्र फडणवीस हे संजय राऊत यांच्या पत्राला उत्तर देण्यास सक्षम आहेत.देवेंद्रजी कधीच कोणालाही भेट टाळत नाही.राज्याच्या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये प्रथमच इतक्या दिवस चांगल्या प्रकारे अधिवेशन चालल असून देवेंद्रजी त्यावेळी व्यस्त होते.त्यामुळे त्यांनी वेळ दिली नसेल,पण देवेंद्रजी संजय राऊत यांना नक्की वेळ देतील अशी भूमिका ( Pune News ) त्यांनी मांडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.