Pawana Dam : पवना धरणात मुंबईच्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज : मुंबईहून आलेल्या दोन पर्यटकांचा पवना धरणात बुडून मृत्यू झाल्याची (Pawana Dam) घटना घडली.

याबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून आलेल्या दोन पर्यटकांचा पवना धरणाच्या बॅकवाटर्समध्ये फांगणी गावात बुडून मृत्यू झालेला आहे. समीर सक्सेना (वय 43 वर्षे, रा. वरली नाका, भीम नगर, वरळी मुंबई- 18) व आर्य जैन, (वय 13 वर्षे, रा. प्रभावदेवी, दादर, मुंबई) या दोन पर्यटकांचा पवना धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

मुंबई येथे राहणारे पाच ते सहा पर्यटक आज दुपारी बाराच्या सुमारास वर्षा विहारासाठी पवना धरणाच्या बॅकवाटर्समध्ये फांगणी गावात आले होते. सर्व पर्यटक पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले. अंदाजे साडेबाराच्या  सुमारास ते बुडू लागल्याने त्यांनी मदत मागण्यासाठी आरडाओरडा सुरु केली. त्यांचा आवाज ऐकून जवळील ग्रामस्थ त्यांच्या मदतीला पोहोचले. त्यांनी 2 ते 3 पर्यटक पाण्याबाहेर काढले. 10 ते 15 मिनिटानंतर दोन पर्यटक पाण्याबाहेर काढण्यात आले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.

Jambut Crime : जांबुत येथील बेपत्ता तरुणाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात की इतर कारणाने?

त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तळेगाव दाभाडे शहरातील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले (Pawana Dam) होते. शवविच्छेदानानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.