Today’s Horoscope 3 September 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग – Today’s Horoscope 3 September 2022

वार – शनिवार

3.9.2022

शुभाशुभ विचार- अनिष्ट दिवस

आज विशेष – गौरी आवाहन

राहू काळ – सकाळी 9.00 ते 10.30

दिशा शूल – पूर्वेस असेल

आजचे नक्षत्र – अनुराधा 22.57 पर्यंत नंतर ज्येष्ठा

चंद्र राशी –  वृश्चिक

________________________

आजचे राशीभविष्य

मेष – (शुभ रंग – लाल)

आज कुठलीही गोष्ट सहज साध्य होणार नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना दैवाची साथ नक्की लाभेल.तरी कोणतेही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही.

वृषभ – (शुभ रंग – पिस्ता)

आज कारण नसताना दुसऱ्याच्या भानगडीत डोकावणार आहात.एखादा विवाह जुळविण्यासाठी यशस्वी मध्यस्थी कराल.आज वैवाहिक जोडीदाराशी चांगले सूर जुळतील.

मिथुन – (शुभ रंग – क्रीम)

नोकरीच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीचा मार्ग आता सोपा झाल्याचे जाणवेल.काही येणी असतील तर मागायला संकोच करू नका.जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे.

कर्क – (शुभ रंग – चंदेरी)

व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे.काही जणांचा आज गूढ शास्त्राकडे कल वाढेल.आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल.

सिंह – (शुभ रंग – स्ट्रॉबेरी)

काही मनाजोगत्या घटनांनी तुमचे मनोबल वाढेल.एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. इतरांना आज मदत करू शकाल.सासूबाईंनी केलेल्या कौतुकाने गृहिणी आनंदित होतील.

कन्या – (शुभ रंग – हिरवा)

आज तुम्हाला विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत.भावनेच्या भरात कुणाला शब्द दिले असतील तर ते पाळावे लागतील.आज बेरोजगारांना नोकरीचे कॉल येतील.

तूळ – (शुभ रंग- जांभळा)

आर्थिक स्थिती आज उत्तम असून तुमचे मानसिक स्वास्थ्यही चांगले असेल.आज संध्याकाळी सहकुटुंब चैन करणार आहात.अति सडेतोड बोलणे टाळा, त्यामुळे नाती दुरावतील.

वृश्चिक – (शुभ रंग- मरून)

आधुनिक राहणीमानाची आवड जोपासता येईल.गृहिणींना एखाद्या समारंभात मनासारखा मान पान मिळेल.आज तुमचे मन काहीसे चंचल असेल.एखादी क्षुल्लक गोष्ट मनाला लावून घ्याल.

धनु – (शुभ रंग – भगवा)

जमा – खर्चाची तोंड मिळवणी करणे आज जरासे अवघड जाईल.गृहिणींना पूर्वी केलेली बचत कामी येईल.प्रवास होतील.प्रवासात आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

मकर – (शुभ रंग – निळा)

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील.नोकरीत बदल करायचा असल्यास चांगल्या संधी चालून येतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होऊ शकतील.

कुंभ – (शुभ रंग – आकाशी)

आज तुम्ही अतिउत्साहात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त आहे.कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते.अधिकारांचा योग्य वापर करण्याची वेळ येणार आहे.भिडस्तपणा नको.

मीन – (शुभ रंग – मोतीया)

कार्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल.वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागणार आहे.वादविवादात आज तटस्थ रहा.थोडे अध्यात्माकडे वळणे हिताचे राहील.

!! शुभम भवतु!!

श्री जयंत कुलकर्णी

फोन ९६८९१६५४२४

(ज्योतिषी व वास्तू सल्लागार)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.