Water News: शहरातील गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद, शुक्रवारचा विस्कळीत

एमपीसी न्यूज – निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रातील (Water News)पाणीपुरवठा विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी (दि.5) पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. तर, शुक्रवारी (दि.6) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे पिंपरी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

 

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवकरांना पाणीपुरवठा(Water News) केला जातो. रावेत येथील बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. निगडीतील सेक्टर क्र.23 येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील विविध ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुवारी (दि.5) शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

Mahalunge : पत्नीसह सासरच्यांनी केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

महापालिकेमार्फत गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केला जाईल. परंतु, त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची सर्व यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि.6) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.