Pune Crime : बनावट डालडा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चतुर्श्रुंगी पोलिसांची मोठी कारवाई

एमपीसी न्यूज : पुण्यातून एक मोठी (Pune Crime) बातमी समोर आली. पाषाण भागात बनावट डालडा बनवणाऱ्या टोळीचा चतुर्श्रुंगी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.  

या प्रकरणी पोलिसांनी संग्रामसिंग तेजसिंग राजपूत (वय 38) याला आटक केली आहे.  पत्र्याच्या शेडमध्ये तूपामध्ये खाण्याचे सोयाबीन तेल, डालडा मिक्स करून बनावट तूप तयार करताना चतुर्श्रुंगी पोलिसांची कारवाई केली.

Water News: शहरातील गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद, शुक्रवारचा विस्कळीत

यामध्ये एकूण 650 किलोचे बनावट तूप जप्त करण्यात आले. तर 135 किलो तेल, 105 किलो डालडा, 54 पत्र्याचे मोकळे डबे, आणि डबे पॅक करण्याचे मशीन व झाकण असा एकूण अंदाजे 3 लाख 50 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

अन्न व औषध प्रशासनाला चतुर्श्रुंगी पोलिसांनी या (Pune Crime) प्रकरणी पत्र लिहिले आहे. तर सणासुदीच्या दिवसांमध्ये बनावट डालडा बनवणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय झाल्या असून पोलिसांची त्यांच्यावर नजर असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.

https://www.youtube.com/watch?v=pKBjF3ikCxc

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.