Nagpur : नागपूरला 5 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये; 45 पदांनाही मंजूरी

एमपीसी न्यूज – नागपूरला 5 अतिरिक्त कौटुंबिक( Nagpur )न्यायालये स्थापन करुन त्यासाठी आवश्यक असणाऱ्या 45 पदांना मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

नागपूर येथे 4 कौटुंबिक न्यायालये आहेत . वाढत्या कौटुंबिक(Nagpur)  विवादांच्या प्रकरणांमुळे या न्यायालयावर अधिक भार पडत आहे. त्यामुळे नव्याने कौटुंबिक न्यायालये स्थापन करावी अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. त्या मागणीच्या अनुषंगाने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही 5 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

Mahalunge : पत्नीसह सासरच्यांनी केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

सध्या नागपूरच्या कौटुंबिक न्यायालयांमध्ये 8 हजार 418 न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित आहेत. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या न्यायालयांच्या उभारणीपोटी 5 कोटी 60 लाख 54 हजार इतका खर्च येणार आहे. त्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. तसेच या न्यायालयांमध्ये आवश्यक असणा-या न्यायिक पदांनाही यावेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये 45 पदांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.