Table tennis : टेबलटेनिस स्पर्धेमध्ये जी.जी इंटरनॅशनल स्कूल विजते  

एमपीसी न्यूज – 14 वर्षाखालील मुलींच्या गटात टेबलटेनिस स्पर्धेमध्ये पिंपरी येथील जी.जी इंटरनॅशनल स्कूल, शाळेने विजयी पताका फडकावली. (Table tennis) आर्या चिखलीकर, श्रेया कणे, त्रिशा शर्मा यांनी स्पर्धेत बाजी मारली आहे. या स्पर्धेत वाकड येथील अक्षरा इंटरनॅशनल स्कुल उप विजेते ठरले आहेत.  

पिंपरी-चिंचवड महापालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील मुलींच्या टेबल टेनिस स्पर्धा आज पार पडल्या. मदनलाल धिंग्रा मैदान, बॅडमिंटन कोर्ट निगडी प्राधिकरण या ठिकाणी पार पडलेल्या स्पर्धेत 22 शाळांमधील 110 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. यावेळी प्रभारी  क्रीडा अधिकारी सुभाष पवार, स्पर्धाप्रमुख रंगराव कारंडे, पंच  चंदर थावानी, संजीब शर्मा,  सुभाष जावीर, युवराज गवारी, बालासो काळभोर, विलास लांडे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

Measles patients : मुंबईत गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ, नागरिकांनो गोवरबाबत काळजी घ्या; पालिकेचे आवाहन  

14 वर्षाखालील वयोगटात जी.जी. इंटरनॅशनल स्कुल, वल्लभनगर पिंपरी विरुद्ध अक्षरा इंटरनॅशनल स्कुल, वाकड यांच्यात टेबलटेनिसचे अंतिम सामने पार पडले, जी.जी. इंटरनॅशनल स्कूलने अक्षरा इंटरनॅशनल स्कुलवर तीन विरुद्ध शून्य असा विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले. (Table tennis) या स्पर्धेत अक्षरा इंटरनॅशनल स्कुल उप विजेते ठरले आहेत.  यामध्ये जी.जी. इंटरनॅशनल स्कुलच्या आर्या चिखलीक हिने अक्षरा इंटरनॅशनल स्कुलच्या निष्का जाधव हिच्यावर 2 – 0 असा विजय मिळवत विजेती ठरली आहे, तर निष्का जाधव हिला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

तसेच जी.जी. इंटरनॅशनल स्कुलच्या श्रेया कणे हीने अक्षरा इंटरनॅशनल स्कुलच्या अवनी चव्हाण हिच्यावर 2 -0 अशी विजयी मात देत अव्वल क्रमांक पटकावला तर अवनी चव्हाण दुस-या स्थानावर राहिली. आणि जी.जी. इंटरनॅशनल स्कुलच्या त्रिशा शर्मा हीने  अक्षरा इंटरनॅशनल स्कुलच्या मिशिका गोहिल हिचा 2-0 असा पराभव करत स्पर्धेत विजेती ठरली असून  मिशिका गोहिल ही उपविजेती ठरली आहे. 14 वर्षाखालील मुलींच्या गटात टेबलटेनिस स्पर्धेमध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल चिंचवड हा संघ तिसऱ्या क्रमांकासाठी पात्र ठरला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.