Warje Crime : पती-पत्नीचे भर रस्त्यात भांडण; मध्यस्थी करणाऱ्या पोलिसालाच मारहाण

एमपीसी न्यूज : भर रस्त्यात पती-पत्नीचे भांडण सुरू  (Warje Crime) असताना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणे होम कॉलनीत हा प्रकार घडला. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक सागर जगताप यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गोविंद नागनाथ सुरवसे (वय 35, रा. मुर्टा नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) याला अटक केली आहे.

Measles patients : मुंबईत गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ, नागरिकांनो गोवरबाबत काळजी घ्या; पालिकेचे आवाहन  

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गोविंद सुरवसे याचे पत्नीसोबत घटस्फोटाच्या कारणावरुन हिंगणे होम कॉलनीतील सार्वजनिक रोडवर भांडण सुरु होते. रात्री सार्वजनिक रस्त्यावर भांडण सुरू असल्याने नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानुसार सागर जगताप व पोलीस शिपाई चव्हाण हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी गोविंद सुरवसे याला समजावून सांगितले. पण, त्याने सागर यांची कॉलर पकडून त्यांना ढकलून देऊन हाताने मारहाण करत मोठमोठ्याने शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर पोलिसांनी त्याला मोटारसायकलवरुन बसवून पोलीस (Warje Crime) चौकीत नेण्याचा प्रयत्न केला. तर, त्याने दुचाकीला लाथा मारुन शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा आणला. अधिक तपास उपनिरीक्षक सावंत करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.