Warje : वारजे येथून दोघांना पिस्टल, जिवंत काडतुसे व कोयत्यासह अटक

एमपीसी न्यूज : पोलिसांनी वारजे (Warje) येथील स्माशानभूमीसमोरील पुलाखाली दोन तरुणांना अटक केली असून त्यांच्याकडून पिस्टल जिवंत काडतुसे व कोयता अशी घातक शस्त्रे जप्त केली आहेत. हि कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि.6) रात्री उशीरा केली.

ओंकार उर्फ टेड्या उमेश सातपुते (वय 23 वर्षे, रा.वारजे माळवाडी) व आशिष राजू बेलुसे (वय 19 वर्षे, रा. नरेगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

PCMC Election : अखेर ठरलं! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणूक, प्रभाग कितीचा असणार?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रे, सोटे, भाले तलवारी, दंड,काठ्या बंदुका तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तू मनाई आदेश असताना देखील त्या आदेशाचा भंग करून आरोपींनी त्यांच्याजवळ बेकायदेशीर रित्या सिल्वर रंगाच्या धातूचे देसी बनावटीचे 1 पिस्टल 4 जिवंत काडतुसे, 1 लोखंडी कोयता जवळ बाळगला.

यावरून आरोपींवर आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा (Warje) दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.