PCMC Election : अखेर ठरलं! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणूक, प्रभाग कितीचा असणार?

एमपीसी न्यूज – गेल्या दीड वर्षांपासून रखडलेली (PCMC Election) पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अखेर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याचे स्पष्ट संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. 1 जुलै 2023 रोजी अद्यावत असलेल्या मतदार याद्या सप्टेंबर ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असल्याचे आयोगाने सांगितले आहे. दरम्यान, प्रभाग तीन की चार सदस्यांचा राहणार याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष्य लागले आहे.

कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या महाराष्ट्रातील महानगर पालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका रखडल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने 2022 च्या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना केली होती.

दरम्यान, राज्यात सत्ता बदल होताच शिंदे-फडणवीस सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द केली होती. त्याऐवजी चार सदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. 13 मार्च 2022 पासून महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे.

Yerawada : येरवडा कारागृहातील कैद्यांकडे पुन्हा सापडले मोबाईल

गेल्या सव्वा वर्षांपासून रखडलेल्या निवडणूका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होण्याची संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 5 जुलै रोजी यासंदर्भातले परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये राज्य विधानसभेच्या मतदार याद्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यासंदर्भात उल्लेख करण्यात (PCMC Election) आला आहे.

दिनांक 1 जुलै 2023 रोजी अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार याद्या सप्टेंबर 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणाऱ्या महानगर पालविका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येतील असे अधिसूचित करण्यात येत आहे, असे या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृ्ष्णमूर्ती यांच्यानावे ही अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात महापालिका निवडणुका होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.