Yerawada : येरवडा कारागृहातील कैद्यांकडे पुन्हा सापडले मोबाईल

एमपीसी न्यूज – मागील काही महिन्यांपासून सातत्याने (Yerawada) कारागृहात मोबाइल सापडत असल्याच्या घटना सुरू आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात बुधवारी सायंकाळी पुन्हा एकदा कैद्यांकडे दोन मोबाइल, दोन बॅटऱ्या, चार्जर आणि एक सिमकार्ड सापडून आले.

तुरुंग अधिकारी, कर्मचारी आणि कैद्यांची कसून झडती घेऊनही कारागृहात वारंवार मोबाइल सापडत असल्याने पोलिसांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महेश तुकाराम माने, अजय महादेव कांबळे, अनिकेत अर्जुन चौधरी आणि नरेश गणेश दळवी या न्यायाधीन (कच्चे) कैद्यांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुरुंग अधिकारी शेरखान पठाण यांनी तक्रार दिली आहे.

Shirur : अमोल कोल्हे यांचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना उत्तर; करारा जबाब मिलेगा!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहात सर्कल एकमधील बराक चारमध्ये काही कैदी मोबाइल वापरत असल्याची कुणकुण प्रशासनाला लागली होती. बुधवारी सायंकाळी बराकीत जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कैद्यांची झडती सुरू केली. माने आणि कांबळे यांच्याकडे कसून चौकशी आणि (Yerawada) खाक्या दाखविल्यावर दोघांनी आपल्याकडचे मोबाईल काढून दिले.

मोबाइल जप्त केल्यावर चार्जर आणि सिमकार्ड मिळून आले नाही. त्यामुळे आणखीन सखोल चौकशी केल्यावर बराकीतील कैदी चौधरी यांच्याकडे मोबाइलचा चार्जर आणि दळवी याच्याकडे सिमकार्ड सापडून आले. बराकीतील चार कैद्यांकडे दोन मोबाइल, दोन बॅटऱ्या,चार्जर आणि सिमकार्ड सापडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.