Shirur : अमोल कोल्हे यांचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना उत्तर; करारा जबाब मिलेगा!

एमपीसी न्यूज : शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी (Shirur) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. त्यांनी उत्तर देताना म्हंटले, आहे की जबाब मिलेगा, करारा जबाब मिलेगा. पुढे ते म्हणाले, की वयाचा आदर ठेवतोय, चार वेळा तुम्हाला उद्धव ठाकरेंनी तिकीट दिले, तरी त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांची साथ सोडून आपण स्वार्थासाठी निघून गेलात. 

पण, 2019 ला मला एकदाच शरद पवारांनी तिकीट दिले आणि आज अडचणीच्या काळात ठामपणे मी त्यांच्यासोबत उभा आहे, हा आपल्या दोघांमधला मूलभूत फरक आहे.

माझ्या अभिनयाविषयी कुचेष्टा केली, तर होय, अभिनय हे माझ्या चरितार्थाचे साधन आहे आणि जनतेला ठाऊक आहे माझी अमेरिकेत कोणतीही कंपनी नाही. त्यामुळे पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल अस करणं योग्य नाही.

Maharashtra Election : ठरलं! सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

आपल्यासारख्या वयस्कर नेत्याने या राजकिय घडामोडींचा निषेध करणं अपेक्षित होते. परंतु, ज्या घटनांमध्ये आपणाला संधीसाधूपणा दिसतो, त्याच वाईट वाटलं 2014 ला मी तुमचा प्रचार केला होता याच वाईट वाटलं.

मीडियासमोर (Shirur) एक बोलून शरद पवार यांना भेटण्यासाठी आडूनआडून जी दारं ठोठवत आहात, या दाराची किल्ली तर माझ्याकडेच आहे. आपल्या वयाचा मान ठेऊन मी आपलं स्वागत करीनच पण, सुसंस्कृतपणा राजकारणात हवा, एवढीच अपेक्षा असल्याचा म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.