Warje : पतीच्या मित्राने घरात घुसून विनयभंग केला; विवाहितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पती घरात नसताना त्याच्या मित्राने घरात येऊन (Warje) पत्नीसोबत छेडछाड करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामनगर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी एका 27 वर्षीय विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सचिन हनुमंत मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी हा फिर्यादीच्या पतीचा मित्र आहे. फिर्यादीचे पती घरात नसताना आरोपी घरात आला आणि त्याने फिर्यादीसोबत अश्लील भाषेत बोलत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने त्याला विरोध केला असता “तुझा नवराच काय पोलीस पण माझं वाकड करू शकत नाहीत. काय करायचे ते कर.. तुझ्या नवऱ्याने मला दिलेले दोन लाख रुपये पण मी (Warje) परत करणार नाही. अन् पोलिसात तक्रार दिली तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली.” असे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Nigdi : जातीच्या आधारावर भेदभाव करणे सावरकरांना मान्य नव्हते

या संपूर्ण घटनेनंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठत या प्रकरणी तक्रार दिली आहे. वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.