Sinhagad : टेलिग्रामवर झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष अन् बलात्कार

एमपीसी न्यूज : सोशल मीडियावरील टेलिग्राम (Sinhagad) या माध्यमातील वधू वर सूचक मंडळमध्ये ओळख झाली. त्यानंतर याच ओळखीचा फायदा घेत लग्न करण्याचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्कार करण्यात आला. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपी भाऊसाहेब उर्फ कार्तिक गंगाराम शिंदे (वय 27) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी व आरोपी यांच्यात टेलिग्राम वरील वधू वर सूचक मंडळामध्ये ओळख झाली होती. याच ओळखीतून आरोपीने फिर्यादी तरुणीचा विश्वास संपादन केला. वेळोवेळी तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले आणि तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

Pune : दुचाकी अडवून धारदार शस्त्राने वार करत लुटमार

दरम्यान काही दिवसानंतर आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर (Sinhagad) पीडितेने सिंहगड पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.