Pune Crime : दांडिया क्लासमधील ओळखीचा गैरफायदा उठविणाऱ्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज : दांडियाच्या क्लासमध्ये ओळख (Pune Crime) झाल्याचा गैरफायदा घेत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्ती करणाऱ्या  27 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

भावेश जितेंद्र जैन (भवानी पेठ, रोहिणी विला) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्वारगेट पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सोळा वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख दांडियाच्या क्लासमध्ये झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. वेळोवेळी तिला फोन करून मेसेज करून मानसिक त्रास दिला.

Sinhagad : टेलिग्रामवर झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष अन् बलात्कार

बोलण्याच्या बहाण्याने तिला कॅम्प परिसरात बोलावून घेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे (Pune Crime) केले. या संपूर्ण प्रकाराविषयी कुणाला काही सांगितल्यास घरी येऊन राडा करेल, आयुष्य बरबाद करेल अशी धमकीही दिली होती. स्वारगेट पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.