Alandi : आळंदीमध्ये लहान मुलांसाठी कराटे अँड किक बॉक्सिंगचे मोफत प्रशिक्षण

एमपीसी न्यूज : आळंदी येथील संस्कृती प्री. प्रायमरी स्कुलमध्ये (देहूफाटा, आळंदी) नियुद्ध कराटे अँड किक – बॉक्सिंग असोसिएशन कोचिंग क्लासेस (Alandi) यांच्या सहकार्याने व माजी नगरसेवक दिनेश घुले यांच्या मार्फत लहान मुलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिराचे 5 मे ते 5 जूनपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

Pune Crime – दांडिया क्लासमध्ये ओळख झाल्याचा गैरफायदा; अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्ती करणाऱ्याला अटक

याचे उद्घाटन शुक्रवार 5 मे रोजी माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख अविनाश तापकीर, राकेश सिंग, संतोष वायाळ, चंद्रकांत जाधव, सुरुज जंगम, उत्तम वराळे, अनघा पाठक, पुजा शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी (Alandi) नियुध्द कराटे व किक बाॅक्सिंगचे मोफत प्रशिक्षणासाठी प्रकाश बोइनवाड आणि प्रणव सकुंडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.