Pimpri Chinchwad : दुचाकी चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात, दोन दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज : दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad) गुन्हे शाखा युनिट दोनच्या तपासी पथकाने ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे सहायक पोलीस फौजदार शिवानंद स्वामी यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक अल्पवयीन मुलगा मोटर सायकल चोरून त्या वाहनावर भाटनगर येथे फिरत आहे.

Alandi : आळंदीमध्ये लहान मुलांसाठी कराटे अँड किक बॉक्सिंगचे मोफत प्रशिक्षण

त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जात मुलाचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यानुसार पोलिसांनी (Pimpri Chinchwad) त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या. पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकऱणी दोन गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले.

हि कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, पोलीस अमंलदार शिवानंद स्वामी, केरप्पा माने, दिलीप चौधरी, उषा दळे, जयवंत राऊत, आतिष कुडके, शिवाजी मुंढे, अजित सानप, उद्धव खेडकर यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.