Pimpri : मोरवाडीत ‘आरआरआर’ केंद्राचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri) वतीने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत अ क्षेत्रिय कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 मधील (नाना- नानी) कापसे उद्यान, मोरवाडी येथे पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते नुतनीकरण, पुर्नवापर आणि पुर्नउत्पादन (आर आर आर) केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, अ क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, स्वच्छ भारत कक्ष समन्वयक सोनम देशमुख, सहाय्यक आरोग्याधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक अंकुश झिटे तसेच ज्येष्ठ नागरिक संघ मोरवाडी व ओंझळ फाऊंडेशनच्या पद्मिनी कांबळे आदी उपस्थित होते.

यापुर्वी केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडील निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये ‘मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर’ या अभियानाअंतर्गत 20 मे ते 5 जून या कालावधीमध्ये रिड्युस, रियुज, रिसायकल केंद्र स्थापन करून सदरची मोहीम राबविण्यात आली होती.

Warje : वारजे येथून दोघांना पिस्टल, जिवंत काडतुसे व कोयत्यासह अटक

या मोहिमेस शहरातील नागरिकांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादामुळे (Pimpri) यापुढेही नागरिकांसाठी अशी मोहीम कायमस्वरुपी होण्याच्या दृष्टीने अ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत रिड्युस, रियुज, रिसायकल केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

ही मोहिम पर्यावरणाच्या दृष्टीने तसेच नागरिकांच्या निरोगी आयुष्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असून पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने या सकारात्मक मोहीमेमध्ये नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखऱ सिंह यांनी केले.

यावेळी बोलताना ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष हनुमंत गुबयाड यांनी सदर उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करून रिड्युस, रियुज, रिसायकल केंद्र पालिकेने सुरू केल्याबद्दल महापालिकेचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.