PSI News : ऊसतोड मजुराच्या मुलाची ‘पीएसआय’ पदाला गवसणी

एमपीसी न्यूज – पाचवीला पुजलेली गरिबी, घरात अठरा विश्व दारिद्र्य (PSI News) समाजातच नव्हे तर गावातही शिक्षणाचा अभाव, वडील ऊसतोड मजुर अशा हलाकीच्या परिस्थिती शिक्षण घेत जिद्दीच्या जोरावर तरुणाने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. 12 तास अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत हे यश मिळविलेल्या तरुणाचे नाव आहे प्रमोद सोमनाथ शिंदे . 

प्रमोद शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सावरगांव येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर या ठिकाणी झाले. तसेच पुढे त्याने पदवीचे शिक्षण 2018 साली बीएससी (रसायनशास्त्र) या विषयात जामखेड महाविद्यालय जामखेड येथून घेतले. तेथून पुढचा जो काही खर्च आहे तो प्रमोदच्या आई-वडिलांना पेलवणारा नव्हता.

Pimpri : मोरवाडीत ‘आरआरआर’ केंद्राचे उद्घाटन

त्यामुळे प्रमोदने जळगाव येथील दीपस्तंभ संस्थेमध्ये बुद्धीच्या जोरावर प्रवेश परीक्षा पास करून प्रवेश मिळवला. दीपस्तंभ संस्थेत अभ्यास करून पोलीस उपनिरीक्षक ( Police Sub Inspector ) या पदाला त्याने गवसनी घातली आहे.

प्रमोदचे वडील सोमनाथ आणि आई सुनीता शिंदे यांनी ऊसतोड मजुराची उचल घेवून मुलांना शिकविले. तिन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. ऊसतोड मजुराच्या, बांधकाम मजुराच्या, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या मजुराच्या मुलाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले यश पाहून त्याचे सर्वेत्र (PSI News) कौतुक होत आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व काबाडकष्ट करणारे माझे आई वडील हे प्रेरणास्रोत असल्याचे प्रमोद याने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.