UPSC NDA Exam : युपीएससीद्वारे घेतलेल्या एनडीए आणि नौदल अकादमी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या (UPSC NDA Exam) शाखांमध्ये 152 व्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आणि नौदल अकादमीच्या 114 व्या भारतीय नौदल अकादमी अभ्यासक्रमासाठी (आयएनएसी) केंद्रीय लोकसेवा आयोगाने 3 सप्टेंबर 2023 रोजी घेतलेल्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे आणि संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने त्यानंतर घेतलेल्या मुलाखतींच्या आधारे पात्र ठरलेल्या 699 उमेदवारांची गुणवत्तेच्या क्रमाने यादी जाहीर करण्यात आली आहे.

एनडीए आणि नैदल अकादमीचा अभ्यासक्रम सुरू होण्याच्या तारखेसंबंधी तपशीलवार माहितीसाठी संरक्षण मंत्रालयाच्या www.joinindianarmy.nic.inwww.joinindiannavy.gov.in आणि www.careerindianairforce.cdac.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Pimpri : … तर वाहनांचा परवाना रद्द करुन फौजदारी गुन्हा दाखल करणार

या याद्या तयार करताना वैद्यकीय तपासणीचे निकाल विचारात घेतलेले नाहीत. निवड झालेल्या उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती असून ती त्यांनी अतिरिक्त महासंचालनालय, ऍडज्युटंट जनरल शाखा, एकात्मिक मुख्यालय, संरक्षण मंत्रालय (लष्कर), पश्चिम ब्लॉक क्रमांक III, विंग-I, आर.के. पुरम, नवी दिल्ली -110066 येथे थेट सादर केलेल्या जन्मदाखला, शैक्षणिक पात्रता इत्यादी आवश्यक प्रमाणपत्रांच्या आधारे असेल.
जन्मदाखला आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे पात्र उमेदवारांना आता सादर करावी लागणार आहेत.

निकाल यूपीएससीच्या https://www.upsc.gov.in. या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. उमेदवारांचे गुण अंतिम निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांनी वेबसाइटवर उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी आयोगाच्या गेट ‘सी’ जवळील सुविधा काउंटरवर वैयक्तिकरित्या किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23385271/011-23381125/011-23098543 वर कोणत्याही कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 दरम्यान संपर्क साधावा.

याशिवाय, एसएसबी/मुलाखतीशी संबंधित बाबींसाठी, उमेदवार दूरध्वनी क्रमांक 011-26175473 किंवा joinindianarmy.nic.in यावर लष्करासाठी प्रथम पसंती म्हणून संपर्क साधू शकतात.  तसेच 011-23010097 किंवा ईमेल: Officer-navy[at]nic[dot]in. किंवा joinindiannavy.gov.in नौसेना/नौदल अकादमीसाठी पहिली पसंती म्हणून आणि हवाई दलासाठी 011-23010231 Extn.7645/7646/7610 किंवा www.careerindianairforce.cdac.in. यावर पहिली पसंती म्हणून संपर्क (UPSC NDA Exam) साधू शकतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.