Vadgaon-Maval : वडगाव येथे अभिनेते संदीप पाठक यांचा एकपात्री नाटकाचा प्रयोग

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथे पोटोबा महाराज देवस्थान ट्रस्ट सहकार्याने सरस्वती व्याख्यानमला कार्यक्रम यंदा कोरोना निर्बंध नसल्याने मोठ्या प्रमाणात आयोजित केला आहे. अनेक दिग्गज व्याख्याते यावर्षी व्याख्यानमालेला लाभले आहेत.(Vadgaon-Maval) दि.03 रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेते संदीप पाठक  यांचे वर्हाड निघाले लंडनला हे लोकप्रिय एकपात्री नाटक सादर झाले   प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

दरम्यान एकपात्री नाटकापुर्वी अध्यक्षांनी व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान सांगितले की, त्यांनी अशोक सराफ यांना घेऊन एका मराठी चित्रपटाची निर्मीती केलेली. परंतु चित्रपटाचे कथानक उत्तम नसल्याने चित्रपट फारसा चालला नाही व भरपूर आर्थिक नुकसान झाले म्हणून तरुणांनी चित्रपट व्यवसायाकडे चुकूनही पडू नये असा सल्ला त्यांनी दिला, (Vadgaon-Maval) त्यानंतर अभिनेते संदीप पाठक यांनी मराठी रंगभूमीचा असा अपप्रचार कोणीही करू नये अशी विनंती केली व त्या वक्त्यव्याचा त्यांनी त्वरित निषेधही केला.मराठी रंगभूमी ही रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने टिकून आहे व तिचा आदर सर्वानी केला पाहिजे असेही ते म्हणाले.

 

PCMC News : ओला कचऱ्याची विल्हेवाट न लावणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांवर 1 नोव्हेंबर पासून दंडात्मक कारवाई

सरस्वती व्याख्यानमालेमध्ये दरवर्षी अनेक दिग्गज नेते,कलावंत व समाजाची सेवा करणारे सर्व स्तरातील वक्ते येत असतात, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळस्कर हे गेली 22 वर्षे अविरत व्याख्यानमालेचे आयोजन करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.